अहमदनगर : सावेडी मसापची निबंध स्पर्धा

0

विभागीय साहित्य संमेलनानिमित्त उपक्रम

अहमदनगर :  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यातील विजेत्यांना संमेलनात पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
नगर येथे 4 व 5 नोव्हेंबरला मसापचे विभागीय संमेलन होत आहे. यजमान असलेल्या परिषदेच्या अहमदनगर उपनगर (सावेडी) शाखेने संमेलनाची तयारी सुरू केली आहे. अधिकाधिक नागरिकांनी, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन संमेलनाचा आनंद घ्यावा, असाच आयोजकांचा उद्देश आहे. त्याचाच भाग म्हणून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे फिरोदिया म्हणाले.
मसाप शाखेचे उपाध्यक्ष सदानंद भणगे म्हणाले, स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन अशा दोन गटांमध्ये होईल. शालेय गट पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मला आवडलेलं पुस्तकफ हा या गटासाठी विषय आहे. या गटातील विद्यार्थ्यांनी 500 ते 700 शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवावा. अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटासाठीसाहित्यानं मला काय दिलं..?फ असा विषय आहे. या गटातील स्पर्धकांसाठी शब्दमर्यादा 800 ते 1000 आहे, असेही श्री. भणगे यांनी सांगितले.
मसाप शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश चव्हाण म्हणाले, निबंध स्पर्धेत प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. संमेलनातच नामवंतांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके दिली जातील. निबंध कागदाच्या एका बाजूने, सुवाच्य अक्षरात लिहिलेले किंवा टाईप केलेले असावेत. पाकिटावर ‘मसाप विभागीय साहित्य संमेलन निबंध स्पर्धा’ असा ठळक उल्लेख करावा. निबंध पाठविण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2017 आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मसापच्या सावेडी शाखेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. निबंध पाठविण्यासाठी पत्ता – जयंत येलूलकर, आदिती अपार्टमेंट (ए), रेणावीकर शाळेजवळ, प्रगती डेअरीशेजारी, सावेडी, अहमदनगर.

LEAVE A REPLY

*