नगरमध्ये रॉयल इनफिल्डची ‘स्टील्थ ब्लॅक’ लॉन्च

0
अहमदनगर : रॉयल इनफिल्ड या कंपनीच्या सावेडी येथील कराचीवाला ऑटोमोबाईल या शो – रुममध्ये कंपनीचे नवीन दुचाकीचे मॉडेल स्टील्थ ब्लॅक या 500 सीसीच्या नवीन मॉडेलचे नुकतेच लॉचिंग करण्यात आले.
या मॉडेलची पहिली दुचाकी नगरमधील युवा उद्योजक राहुल मुथियान यांना स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रॉयल इनफिल्डची स्टील्थ ब्लॅक या नवीन मॉडेलला नवीन रिअर डिस्क बसविण्यात आलेली असून, 500 सीसीचे अद्यावत इंजिन व ब्लॅक मॅट फिनिशमध्ये ही दुचाकी उपलब्ध असून, रॉयल इनफिल्डमध्ये सध्या 350 सीसी पासून 650 सीसी पर्यंच्या अद्यायावत तंत्रज्ञानयुक्त अशा दुचाकीची निर्मिती केली जात आहे. व निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

LEAVE A REPLY

*