‘भारत बंद’ ला जिल्ह्यात प्रतिसाद

0
अहमदनगर – पेट्रोल -डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस ने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला जिल्ह्यात प्रतिसाद मिळतो आहे. सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यवहार बंद पाळत संपास पाठींबा दिला जातो आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील अकोले, पुणतांबा शहरात सकाळ पासूनच बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल तहसीलदार, पोलीस निरीक्षक व आगार प्रमुख यांना निवेदन देऊन शाळा,महाविद्यालये, एस टी सेवा,पेट्रोल पंप आदी बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

काँग्रेससह देशातील डाव्या पक्षांनी आज इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. बंदला राज्यभरातून प्रतिसाद देण्यात येत आहे. दरम्यान ; जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान परिस्थिती वर लक्ष्य ठेऊन आहेत.

लोणी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारत बंदच्या आंदोलनात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा लोणी येथे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णसाहेब म्हस्के पाटील यांनी निषेध केला. आणि प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.

श्रीगोंदा

सोमवार हा श्रीगोंदा चा बाजार दिवस असला तरी कॉंग्रेस राष्ट्रवादीने पुकारलेल्या भारत बंद ला प्रतिसाद दिला.

संगमनेर

पेट्रोल व डिझेल सह भरमसाठ वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. खोटी आश्‍वासने देणार्‍या सरकारचे अच्छे दिन कुठे हरवले ? असा सवाल करण्यात आला. महागाईने सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले असून जनता सरकारला वैतागली असल्याची टिका काँग्रेस नेते मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राहुरी

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना बंद पाळून सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नेवासा

भारत बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद. वाहतूक सुरळीत दुकाने बंद.

LEAVE A REPLY

*