अहमदनगर : रंगकर्मी प्रतिष्ठानची कार्यकारिणी जाहीर

0
अध्यक्षपदी रितेश साळुंके तर सचिवपदी नानाभाऊ मोरे यांची बिनविरोध निवड.
अहमदनगर : येथील नाटय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या रंगकर्मी प्रतिष्ठान अहमदनगर या हौशी नाट्यसंस्थेची कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्ष रंगकर्मी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प्रशांत जठार हे होते. नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करणे आणि वार्षिक सांस्कृतिक, सामाजिक आणि नाट्य उपक्रमांचे नियोजन हे बैठकीचे प्रमुख विषय होते. माजी अध्यक्ष प्रशांत जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष – रितेश साळुंके, उपाध्यक्षा – सौ. प्रज्वला कासलीवाल, सचिव – नानाभाऊ मोरे, सहसचिव – अविनाश कराळे, खजिनदार – तुषार चोरडिया, सहकोषाध्यक्ष – राहुल सुराणा, संघटक – विशाल कडूसकर, प्रसिद्धी प्रमुख – श्रीकांत हेबळे, कार्यकारिणी सदस्य – शेखर वाघ, वैभव कुऱ्हाडे, प्रशांत जठार.
या प्रसंगी ७ स्विकृत कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.
प्रीतम होनराव, अक्षय म्हस्के, अंजली गुंडे, रसिका यादवाडकर, सैमसन अलसमराव, सचिन जोशी, रवींद्र व्यवहारे.
याप्रसंगी नवनिर्वाचित कार्यकारिणीने वार्षिक नियोजन केले. सांस्कृतिक कार्यसंचालनालय (महाराष्ट्र शासन आयोजित) राज्य नाट्य मराठी, हिंदी, बाल नाट्यमहोत्सवामध्ये संस्थेच्या वतीने दर्जेदार नाटकांचे उत्कृष्ठ सादरीकरण करणे. विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवणे. विविध सामाजिक उपक्रम ज्यामध्ये वृक्षारोपण, मुलगी वाचवा – मुलगी जगवा, रक्तदानाचे महत्व, अवयव दानाचे महत्व, बालसंगोपन आणि शैक्षणिक उपक्रम, प्रौढ साक्षरता अभियान इत्यादी सामाजिक विषयांवरील नाट्यनिर्मिती करून समाज प्रबोधन करणे. नाट्य, लघुपट व चित्रपट निर्मिती प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे. ज्येष्ठ कलावंतांसाठी पेन्शन योजना सुरु करणे, स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून बहुप्रतीक्षित नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत अ.नगर महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे, कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व महाराष्ट्र शासन यांचेकडे रितसर मागणी करून सदर मागण्या मान्य करून घेणेसाठी प्रयत्न करणे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असणाऱ्या विविध उपक्रमाचे वरीलप्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारिणीने वार्षिक नियोजन केले.

LEAVE A REPLY

*