राळेगणच्या दोन संघांची पुणे विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, नगर आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत राळेगणच्या श्रीराम विद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत 17 वर्षे वयोगटातून मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात देहरे संघाचा पराभव करत पुणे विभागीय स्पर्धेसाठी राळेगणचा संघ पात्र ठरला. अंतिम सामन्यात तेजस हराळ, कार्तिक कोतकर, कार्तिक भापकर, पल्लवी खोटे, पल्लवी महांडूळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघास विजय मिळवून दिला. विजयी संघास क्रीडा शिक्षक विजय जाधव व राजेंद्र कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव दिपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रामचंद्र दरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन सुकटे आदींनी अभिनंदन केले. यावेळी बापू साबळे, सुरेश बोठे, बाळासाहेब पिंपळे, सुनीता कवडीवाले, संजय भापकर, दादासाहेब रोकडे, सुजीत झेंडे, भिमाजी शिंदे, शंकर झेंडे, अशोक साबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*