Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर : पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो

Share

कोतुळ (वार्ताहर) : आज (दि. १२) वाजेपर्यत मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने उगमावरील अंबित धरण भरल्यानंतर पिंपळगाव खांड मध्ये पाण्याची आवक सुरू झाली होती. मात्र पावसाच्या हुलकावणीने धरण भरण्यास अडथळे येत होते.

काल पासून पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक वाढली. यामुळे आज शनिवारी दुपारी १२ वाजता धरण भरून वाहू लागले. यामुळे धरणाचे खालील मुळा नदी वाहती झाली आहे.

अंबित पाठोपाठ मुळा नदीवरील ६०० दलघफु साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण भरले आहे. आता राहुरी व नगर शहराची तहान भागविणाऱ्या व जिल्ह्यात सर्वात मोठे धरण असणारा मुळा धरणाकडे पाण्याचा प्रवाह झेपावला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!