नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पाऊस अन् थंड वारे, पिके संकटात

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा तडाका कोकण किनारपट्टीवर बसला असला तरी नगर जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. दिवसभर थंड वारे वाहत होते.

ढगाळ वातावरणामुळे नवीन लागवड झालेला कांदा, डाळींब, द्राक्ष, हरभरा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मन्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. तर हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. घड काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना या

पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून सर्वाधिक धोका आहे. या द्राक्षांमध्ये साखरभरणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.तर फुलोर्‍यात असलेल्या बागांना वाचविण्याचासाठी प्रतिबंधात्मक फवारण्यांसह डावण्यापासून वाचविण्यासाठीही फवारणी करावी लागणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*