Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

‘प्रवरे’च्या ठेवीदारांची दिवाळी जोरात

Share

पाऊण कोटी मार्केटमध्ये शुक्रवारपासून ठेवींचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्वाश्रमींची रावसाहेब पटवर्धन आणि आताची प्रवरा पतसंस्थेने कात टाकली असून संस्था उर्जितावस्थेत आली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचे कर्ज वसुली अन् तितक्याच ठेवी जमा झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. सुमारे 700 ठेवीदारांना दिले जाणारे पाऊण कोटी रुपये सणासुदीच्या काळात नगर मार्केटमध्ये येणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुंकूलोळ यांनी ही माहिती दिली आहे.

पूर्वीश्रमीची रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था संस्था जून 2014 रोजी आर्थिक अडचणीत आल्यानंतर तरलता संपुष्टात आली. पर्यायाने ठेवीदारांना ठेवी देण्यास असमर्थ संस्था अयशस्वी ठरली. पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या हजारो ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले गेले. अशा स्थितीत सहकारातील दूरदृष्टी असलेले नेते माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकर घेऊन संस्था पूर्ववत चालु करण्याचा निर्णय घेतला. पटवर्धनचे नामांतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या,अ.नगर असे झाले. नव्या संचालकांनी थकीत कर्जदारांवर कायदेशीर मार्गाने कर्ज वसुली करण्यावर जोर दिल्याने कर्ज वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास सक्षम झाली. संस्थेतील सर्वसामान्य गरीब व आर्थिक परिस्थिती नाजुक असलेल्या 700 ठेवीदारांच्या 10 हजारातील आतील ठेवी परत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. 19 ऑक्टोबर पासुन ठेवी परत वाटप सुरु करण्यात येईल अशी माहिती संरथेचे अध्यक्ष राजेंद्र कुंकुलोळ यांनी दिली.

विखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळानेही संस्थेची नियोजनबध्द थकीत कर्ज वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्याला प्रतिसादही मिळाला. तसेच कर्जदार जामीनदारांच्या स्थावर मिळकतीचे लिलाव केले असता ते लिलाव ठेवीदारांनीच घेतले. त्यातून 3 कोटीची कर्ज वसुली होऊन तेवढ्याच रकमेच्या ठेवी कमी झाल्या आहेत.संस्था आर्थिक सक्षम झाल्याने ठेवीदारांना टप्याटप्याने ठेवींचे वाटप करणार आहे. तसेच, संस्थेतील सर्वसामान्य गरीब व आर्थिक परिस्थिती नाजुक असलेल्या 700 ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. ठेवीदारांचे असेच सहकार्य संस्थेला यापुढेही मिळेल अशी अपेक्षा संचालक मंडळाने व्यक्त केली आहे. व उर्वरीत ठेवीदारांनाही लवकरात लवकर ठेव रक्कम देण्यात येईल अशी माहिती संरथेचे अध्यक्ष राजेंद्र कुंकुलोळ यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!