Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

पोस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्ह्याची डाक सेवा ठप्प

Share

अहमदनगर – देशभरातील ग्रामीण डाक कर्मचारी मंगळवार (दि.१८) पासून बेमुदत संपावर गेलेले असून त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा गेल्या ३ दिवसांपासून ठप्प झाली आहे. या संपाची सरकारने कुठलीही दखल न घेतल्याने संघटनेने जिल्हाध्यक्ष कॉ. संजय लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील पोस्टाच्या मुख्य कार्यालयासमोर गुरुवारी (दि.२०)सकाळपासून निदर्शने करीत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तसेच आमच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने कार्यवाही केली नाही तर यापुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात संघटनेचे सचिव कॉ. एस. एस. परभाणे, कार्याध्यक्ष कॉ. ए. एस. पवार, खजिनदार पी.एस.वराडे, आर. आर. खुडे, सिद्धेश्वर घोडके, गीताराम शिंदे, संतोष चंदन, एकनाथ काकडे, एम.डी. मोरे, राहुल गरकळ, एस.बी.जाधव, अशोक बंडगर, विजयकुमार एरंडे, राजेंद्र गवते, भीमराज गिरमकर, लक्ष्मण बर्डे, सुर्यकांत श्रीमंदिलकर, रत्नमाला टेके, जयश्री साबळे, दिलीप मेटे, ई.जे. काकडे, बी.व्ही.दरंदले, डी.बी. उनवणे यांच्यासह ग्रामीण डाक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!