भैय्या अन् गाडेंनी पैसे खाल्ले

0

पंजाबी-शेख यांच्या संवादाची खळबळजनक क्लीप व्हायरल

अहमदनगर (प्रतिनिधी) – दहा नंबर वार्डात शिवसेनेचे उमेदवार न देण्यासाठी शिवसेनेच्या भैय्यांनी अन् गाडेंनी पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोप करणारी माजी नगरसेवक जसपाल पंजाबी यांची ऑडिओ क्लीप नगरात व्हायरल झाली आहे. या क्लिमध्ये ते राष्ट्रवादीचे उमेदवार झीनत शेख यांचे मिस्टर सलीम शेख यांच्याशी संवाद करत असल्याचे ऐकू येते. या क्लीपमुळं बसपच्या पॅनलमध्ये फाटाफूट झाल्याचंही समोर आलं आहे.
जसपाल पंजाबी हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेने गत महापालिका निवडणुकीत पुरस्कृत केलेले सचिन जाधव यांनी यंदा चौघांची मोट बांधत हत्तीवर स्वार होण्याचा निर्णय घेतला. हत्तीच्या या पॅनलमध्ये जसपाल पंजाबी यांची पत्नी अनिता, सचिन जाधव यांची पत्नी अश्‍विनी, काँग्रेसचे नगरसेवक मुदस्सर शेख आणि अक्षय उनवणे यांचा समावेश आहे. अश्‍विनी सचिन जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवक झीनत सलीम शेख यांनी  शड्डू ठोकला आहे. झीनत शेख यांचा पूर्वीचा वार्ड मुकुंदनगर असला तरी त्यांनी तो सोडून सर्जेपुराच्या दहा नंबर वार्डातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. जसपाल पंजाबी यांच्या विरोधात भाजपच्या इशरत शेख आणि काँग्रेसच्या शमीम शेख उमेदवार करत आहे.

निवडणुकीदरम्यान जसपाल पंबाजी आणि झीनत यांचे पती सलीम शेख यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप शहरात चर्चेचा विषय झाली आहे. या ऑडिओत जसपाल हे शेख यांना मदत करण्यास तयार असल्याचे ऐकू येते. वार्डातील हिंदू मतदान मला मानणारे आहे. त्याची तू काळजी करू नको, माझ्या घरात बसून त्यांना पैसे वाट. पैसे वाटप करतेवेळी त्यांना शपथ देऊ. त्यामुळं ते तुलाच मतदान करतील. त्या बदल्यात तूम्ही मला मतदान करा असा संवाद सुरू असल्याचे ऐकू येते. याच ऑडिओ क्लीपमध्ये जसपाल आणि झेंडे नावाच्या व्यक्तीने शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. पण ती मिळाली नाही. या वार्डात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार नाही, असा रिपोर्ट शिवसेना पक्षप्रमुखांना दिला गेला. शिवसेनेच्या भैय्यांनी अन् गाडेंनी उमेदवारी न देण्यासाठी पैसे खाल्याचा खळबळजनक संवाद या ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे. तक्रार करून काही फायदा नाही अशी हतबलताही पंजाबी यांच्या मुखातून व्यक्त केली आहे. मात्र या क्लीपची सत्यता पडताळणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

‘त्याला’ पाडायचेच
काही झालं तरी ‘त्याला’ पाडायचेच असाही संवाद यात झालेला ऐकू होता. त्याचं नाव नसलं तरी ती व्यक्ती सचिन जाधव असल्याचे लोकेट होते. पंजाबी हे जाधव यांच्या पॅनलमधील उमेदवार असून ते विरोधकाशी मोबाईल फोनवर संभाषण करत असल्याने दहा नंबरमध्ये हत्तीच्या पॅनलमध्ये फाटाफूट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. आता मतदानाला दोन दिवस अवधी शिल्लक राहिल्याने निवडणुकीच्या मैदानात यातून नव्याने काय उद्भवणार, याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे.

‘माझ्या घरात बसून पैसे वाट
‘माझ्या मर्जीतील खास हिंदू मतदार आहेत. त्यांना माझ्या घरात बसून तू पैसे वाटप कर. त्यांना शपथ घ्यायला लावू. त्यामुळं ते मतदान तुलाच पडेल, त्याची काळजी करू नकोस. कितीची कमिटमेंट झाली, तर पंचवीसची. अन् मिठाईही पाठविली’ असा संवाद या क्लिपमध्ये असल्याचे निदर्शनास येते.  

LEAVE A REPLY

*