लोकशाही धोक्यात : फौजिया खान

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपाचे मंत्री देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएसच्या दबवाखाली भाजप सरकार संविधानिक पदे भरत असल्याचे सांगत देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री फौजिया खान यांनी केला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खान बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि.प.उपाध्यक्ष रेश्मा आठरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते. प्रदेश उपाध्यक्ष शारदा लगड, हेमलता मालपाणी आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यातेत वाढ होत आहे. मराठा समाजासोबत मुस्लिम, धनगर, लिंगायात समाजत देखील रस्त्यावर उतरला आहे. मात्र सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही. आगामी महिन्यात नाशिक येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

*