आघाडीचं तुम्हीच ठरवा

0
अंकुश काकडे मनपात संग्राम जगतापांचे नेतृत्त्व
राष्ट्रवादीत पांडुरंग अभंगांच्या शब्दाला किंमत नाही
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की स्वबळ आजमावायचे याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल. ही निवडणूक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढवून महापालिकेत सत्ता आणू, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी व्यक्त करतानाच नगर दक्षिणेच्या जागेवरून पांडुरंग अभंग यांचा समाचार घेतला. त्यांच्यावर कारवाईबाबत प्रदेश ठरविल. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच लोकसभेबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी भवन येथे आगामी महापालिकेच्या निवडणूकच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा राष्ट्रवादी भवन येेथे आयोजित करण्यात आला होते. त्यावेळी काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, प्रदेशउपाध्यक्ष शारदा लगड, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, नगरसेवक संपत बारस्कार, कुमार वाकळे, समद खान, विपूल शेटिया, रेश्मा आठरे, अंजिली आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना काकडे म्हणाले, आगामी निवडणूका या आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणूक स्वबळावर लढवयाची कि आघाडी करून याचा निर्णय स्थानिक नेते घेणार आहे. शहरातील सर्व प्रभागाचा अहवाल मागविण्यात येईल. स्थानिक नेत्याची शिफारस आल्यावर त्याचा विचार करण्यात येणार आहे. आगमी महापालिकेची निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे. अनेक मित्रपक्षात घडामोठी झाल्या आहेत. मात्र याचा परिणाम पक्षात झाला नाही. जळगांव सांगली महापालिकेच्या निवडणूकीमध्ये भाजपने साम, दाम, दंडचा उपयोग करून सत्त मिळवली. अनेक विजयी झालेले उमेदवार हे राष्ट्रवादी व अन्य पक्षाचे आहे. मेळाव्यात बोलतांना प्रदेशाध्यक्ष राणा पाटील म्हणाले, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे बाजारपेठ उध्वस्थ झाली आहे. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूकीमध्ये खिसेकापू सरकारला खाली खेचण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भोसले आखाड्यातील झिंजुर्डेंचा प्रवेश
भोसले आखाडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलीप झिंजुडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात झिंजुडे हे उतरणार आहेत. या प्रवेशामुळे ते संभाव्य तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू आहे. मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर आणखी काही नेत्यांचे प्रवेश होतील, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.

प्रदेश राष्ट्रवादी ठरविल कारवाईचे
नगर दक्षिणेच्या लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ शरद पवार यांना आहे. पांडुरंग अभंग यांच्या शब्दाला काय किंमत, अशी हेटाळणी करीत राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. याबाबत प्रदेश कारवाई करेल, असेही ते म्हणाले. अभंग यांनी दोनच दिवसांपूर्वी ही जागा काँग्रेसला देण्याचे सूतोवाच केले होते. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते.

LEAVE A REPLY

*