कर्डिलेंची भाजप ऑफर कॉमेडीच!

0
विखे । अभंगांच्या प्रस्तावाचे स्वागत
मनपासाठी लवकरच राष्ट्रवादीसोबत बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी) – आ. शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. सुजयना दिलेली खासदारकीची ऑफर ही कॉमेडी होती. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या मताचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. लोकसभेच्या जागेबाबत अद्याप राष्ट्रवादीशी चर्चा झालेली नाही. मात्र, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होईल. त्यावेळी नगरच्या जागेचा विषय निघाल्यास पाहू, असे स्पष्टीकरण विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
तसेच नगर महानगरपालिका निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांची लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचा आमचा आग्रह राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले.शुक्रवारी नगरमध्ये आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यातम विरोधी पक्ष नेते विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब म्हस्के, प्रभारी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, माजी आ. नंदकुमार झावरे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जगगनाथ राळेभात, सपंत म्हस्के, सुरेश करपे, हेमंत उगले, दीप चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाने व राज्य सरकारने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे. सरकारचे अनेक घोटाळे पुढे येत आहे. सरकारने कृषिमूल्य आयोगाची अंमलबजावणी केली नाही. शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव घोषणा नुसता नावालाच आहे. त्याचा कोणताच उपयोग सामान्य नागरिकांना होत नाही. राज्यातील शांतता भंग होत आहे. भीमा कोरेगाव हे त्याचे एक उदाहरण आहे. लोकांचा या सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही. काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला अनेकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सरकारने प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये देतो हमीभाव देतो असे सांगून मोठी फसवणूक करत आहे शेतमालाचा भाव हमीभाव देतो असे सांगून प्रत्येक निवडणुकीत करतोय फसवणूक करतोय देशातील तरुण हा बेरोजगार झाला आहे. दोन कुठे नोकरा उपलब्ध होतील असे सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात दोन लाख लोकांना सुद्धा नोकर्‍या उपलब्ध झाल्या नाही. व्यापरी उद्ध्वस्त झाला. नोट बंदीमुळे त्यामुळे रोजगाराच्या संधी गेल्या. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. याच्या निषेधार्थ देशात व राज्यात सप्टेंबरला भारत बंदचे आयोजन केले आहे. व्यापारी नागरिकांकडून सहकार्य करण्याची गरज आहे. या बंदमध्ये राष्ट्रवादी देखील सहभागी होणार आहेत. शहरातील व जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे.

सरकारला सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भाजपाचे आमदार, नेते बेताल वक्तव्य करत आहेत. राम कदम यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही करत आहे. भाजपाने राम कदम यांची हकालपट्टी करावी. मागील वेळी रावसाहेब दानवे, आता कदम सरकारचा काय चाललंय हे काही समजत नाही. राम कदम यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. अहमदनगरच्या महानगरपालिका निवडणुकीबाबत दोन्ही काँग्रेसची लवकरच बैठक होईल. आमचा आघाडीचा आग्रह आहे. पेट्रोल दरवाढ इमागे मोठे राजकारण लपले आहे निवडणुका जवळ आल्या याच पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आणि सामान्य नागरिकांना सांगायचे की आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले सरकार टाकत आहे.

नगर एमाडिसी परिसरातील भूसंपादनाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. त्यावर विखे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी भूखंड घोटाळा झालेला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या जमीन घेऊ नये. अनेक ठिकाणी भूसंपादन केले जाते मात्र याठिकाणी काहीच होत नाही, असा आरोपी विखे यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

*