Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

गडाखांच्या घराची झाडाझडतीच्या निषेधार्थ एकवटले नगरकर

Share

साहित्यिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्षेत्रातील लोक भेटले जिल्हाधिकाऱ्यांना

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केेलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर आज एकवटले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन कलेक्टरांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी केली.

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झाडाझडती घेतली. वास्तविक शंकरराव घरात नाहीत, हे प्रशांत गडाख यांनी पोलिसांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही. गडाख यांच्या बेडरुमपर्यंत जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेत ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्याशी अशोभनीय वर्तणूक केली. त्याचा निषेध करण्यासाठी साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आज सोमवारी निवेदन दिले.

मसापचे सावेडी शाखाध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.एस.एस. दीपक, डॉ. व्हि.एन. देशपांडे, डॉ.भूषण अनभुले, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, मेधाताई काळे, शिवाजी साबळे, राजेंद्र गांधी, डी.एम.कांबळे, अशोक गायकवाड, स्नेहलयाचे गिरीश कुलकर्णी, पवन नाईक, संजू तनपुरे, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, श्रीनिवास बोजा, डॉ. क्रांतीकला अनभुले, अंगत गायकवाड, साहेबान जहागीरदार, संतोष बलदोटा, चंद्रकांत पालवे, बापू चंदनशिवे, शैलेश गवळी, ज्ञानेश शिंदे, अजित जगताप, मनिष चोपडा, अतुल रचा, संजय दळवी, हरिभाऊ डोळसे, अ‍ॅड. शेखर दरंदले यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!