तपोवनच्या महाराजांमुखी ‘जय श्रीराम’

0
ढवण खासदारांच्या दारात
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना सोडल्यानंतर महाराज अर्थात दिगंबर ढवण कोणत्या पक्षात जाणार या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराजांनी खासदार दिलीप गांधी दरबारी हजेरी दिली. गांधींनीही पेढा भरवित महाराजांचे तोंड गोड केले. आता महाराजमुखी श्रीराम जप येईल अशी चर्चा सुरू झालीय.

दिगंबर ढवण यांनी शिवसेना शहर उपप्रमुख पदाचा तर पत्नी विद्यमान नगरसेविका शारदाताई यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. तो पुन्हा स्वगृही परततील किंवा अन्य पक्षात जातील अशी अटकल बांधली जात होती. दुसर्‍या पक्षात गेले तर कोणत्या पक्षात जातील याचीही चर्चा रंगली होती. मात्र रविवारी महाराजांनी खासदार दिलीप गांधी यांच्या दरबारात हजेरी लावली. तीही पत्रकारांसमक्ष. खासदारपूत्र सुवेंद्र यांनी महाराजांना पेढा भरवित तोंड गोड केले.
प्रभागातील विकास कामांसाठी खासदारसाहेबांकडे आलोय, असे सांगत महाराजांनी सारवासारव केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर खासदारसाहेब अन् महाराजांमध्ये बंद खोलीत गलबत झाली. आता महाराज भाजपात जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे.
………….
ही स्टंटबाजी तर नाही ना..
महाराजांना भाजपात जायचे होते तर ते गुपचूपपणे खासदारसाहेबांशी चर्चा करू शकत होते. भाजप प्रवेशानंतर त्याची व्यच्यता झालीच असती. पण महाराज थेट पत्रकार परिषद सुरू असताना गांधींच्या कार्यालयात पोहचले. त्यांना याची कल्पना असतानाही ते तेथे आले. पत्रकारांमार्फत त्यांना पूर्वाश्रमींच्या नेत्यांना निरोप पोहचवायाचा तर नाहीना… म्हणूनच ही स्टंटबाजी तर नाही ना… अशी चर्चा सुरू झालीय.

LEAVE A REPLY

*