खासदारसाहेब टक्केवारीतच हुश्शार

0

नगर टाइम्स,

शहराचा अभ्यास कच्चा ; प्रा. विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा अहमदनगरचा अभ्यास कच्चा तर संस्थेच्या कर्जप्रकरणातील टक्केवारीचा अभ्यास मात्र पक्का असल्याचा टोला राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी मारला आहे. सारसनगरच्या पाणी टँकरसंदर्भात त्यांचे वक्तव्य बालिशपणाचा कळस करणारे असल्याचे विधाते यांनी म्हटले आहे. आमदारांना नगर शहर विकासाचे घेणे-देणे नाही. त्यांच्या भागाला 15 वर्षापासून टँकरने पाणी पुरवठा सुरू असून माझ्यामुळं सारसनगरची पाण्याची टाकी कार्यान्वीत झाल्याचे खासदार गांधी यांनी जाहीरसभेत म्हटले होते. त्याला राष्ट्रवादीचे विधाते मास्तरांनी उत्तर दिले आहे.

सारसनगरची पाण्याची टाकी कोठे आहे, त्या टाकीवरून कोणत्या भागाला पाणी पुरवठा होणार याची माहितीच खासदारांना नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांचाच नाहीतर खासदारांचाही अभ्यास कच्चा असल्याचे यातून समोर आले. पाण्याची टाकी समर्थनगर येथे असून त्या टाकीचा आणि सारसनगरचा काही संबंध नाही. सारसनगरची टाकी बांधून ती सुरूही झालीय. त्यामुळं त्यांचे वक्तव्य अपुर्‍या माहिती आधारे करण्यात आले आहे. खासदार दिलीप गांधी हे अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थेचा उल्लेख टाळून विधाते यांनी बैठकीतील संचालकांचा हजेरीचा मुद्दा उकरून काढलाल आहे. कर्जप्रकरणे कशी मंजुर होतात, हे नगरकरांना ठाऊक असल्याचे विधाते यांनी म्हटले आहे. तुमचा फक्त टक्केवारीचा अभ्यास पक्का असल्याचा टोमणा विधाते यांनी मारला आहे. दुसर्‍यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या धोरणाचा विचार करावा असा सल्ला विधाते यांनी दिला आहे.

कोट्यवधींच्या थापा
जळगाव महापालिकेत सत्ता आली म्हणून मुख्यमंत्र्यांना अभिनंदनाचे पत्र द्यायचे. इकडे पत्रकारांना नगर विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याच्या थापा सांगायाच्या. 10 कोटी रुपयांची थापही मंजूर करता आली नाही. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याचे भूषण त्यांना असल्याचा टोला विधाते यांनी मारला. आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहर विकासासाठी नगरोत्थान योजनेतून 70 कोटी रुपये आणले आहेत. त्याच निधीतून खासदारांच्या घरासमोरचा रस्ता झाला हे ते विसरले का? असा सवाल विधाते यांनी केला. तुम्हाला सात लाखही आणता आले नाही असे विधाते यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*