प्रचारतोफा मुक्या

0

उद्या सायंकाळी 5 वाजता सांगता उमेदवारांचा भेटी-गाठींवर भर

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या (रविवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करण्यास निर्बंध येणार असल्याने वैयक्तिक गाठी-भेटींचा छुपा प्रचार सुरू होणार आहे. मंगळवारी (दि. 23) 18 लाख 54 हजार मतदार 2030 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहे. केंद्रावर सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी दिली.

अशी आहे मतदान व्यवस्था
मतदान प्रक्रियेसाठी 8932 कर्मचारी आणि 198 क्षेत्रीय अधिकारी असे 9130 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर जाण्यासाठी 646 वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून, नगर लोकसभा मतदारसंघात 10 सखी मतदान केंद्र असणार आहेत. 152 मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, 192 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत असणार्‍या 12157 कर्मचार्‍यांना टपाली मतपक्रिया वाटप करण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहन, व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

असे आहेत मतदार
नगर शहर : 285913
शेवगाव- पाथर्डी : 338788
राहुरी : 288127
पारनेर : 317008
श्रीगोंदा : 309324
कर्जत-जामखेड : 315088
एकूण : 1854248

मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी अडचण आल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*