अहमदनगर : मोदींविरोधात सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह लिखाण करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

0

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई शनिवारी झाली आहे. पोलीस कर्मचारी शिंदे हे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक होते.

संगमनेर तालुक्यातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलीस कर्मचारी शिंदे यांनी मोदी यांच्या विरोधात आलेली पोस्ट फॉरवर्ड केली होती. या ग्रुपवर पंतप्रधान मोदी काही समर्थक मेंबर होते. त्यांनी शिंदे यांच्या विरोधात तक्रार केली होती. यानंतर नंतर सायबर विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यात शिंदे यांच्या मोबाईल वरून संबंधित मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्‍यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हार्दिक पटेलांचे गुजरातमध्ये आंदोलन सुरू असतांना भाजप सरकारने त्याठिकाणी तीन दिवस नेट बंद ठेवले. राजस्थानमध्ये जाट आंदोलन सुरू असतांना त्या ठिकाणीही तीन दिवस नेट बंद ठेवण्यात आले होते. उद्या ज्येष्ठ समाज सेवक आण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्यानंतर नेट बंद ठेवल्यास नवल वाटू नये. तसेच राहिला प्रश्‍न पोलीस कर्मचारी शिंदे यांच्या निलंबनाचा तर या घटनेचा निषेध करायला हवा. देशात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, ते हिरावून घेत हिटलरशाही सुरू झाली आहे. गतनिवडणुकीत सोशल मिडियामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीका करूनच निवडणूक लढवली.कायदा लोकांच्या संरक्षणासाठी आहे की लोकांना घाबरवण्यासाठी तेच कळत नसून लवकरच सर्वसामान्यांवरपण निर्बंध येतील. सरकारबाबत गोड गोड लिहा आणि देशभक्तीचे प्रमाण पत्र मिळवा.अन्यथा देशद्रोही म्हणून खटल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

….. अ‍ॅड. श्याम आसावा, जिल्हाध्यक्ष, भष्ट्राचार विरोधी जनआंदोलन.

LEAVE A REPLY

*