जागा परस्पर दुसर्‍याच्या नावावर केल्याने तरुणाचे जिल्हा परिषदेत उपोषण

0

वनकुटेच्या सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करावेत
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील जागेची नोंद परस्पर बदलून ती दुसर्‍याच्या नावावर केल्याप्रकरणी ग्रामसेवक व सरपंचाविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत गणेश एकनाथ साळवे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले.

ग्रामसेवक व सरपंच यांनी अधिकाराचा गैरवापर करून आपल्या नावावरील जागा दुसर्‍याच्या नावावर केली. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करावा तसेच आपल्याला आपली मूळ जागा परत नावावर करून मिळावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

साळवे यांच्या मालकीची जागा दुसर्‍याच्या नावावर परस्पर करण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्या जागेवर अतिक्रमणही केले होते. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व सरपंच यांनी मध्यस्थी करून सदर जागेवरील अतिक्रमण काढून घेण्याची ग्वाही दिली होती.

मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण काढलेले नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे साळवे यांनी सांगितले. या उपोषणात अनिल साळवे, सचिन साळवे, बाळासाहेब जाधव, निवृत्ती साळवे, संदीप गायकवाड, स्वप्नील उबाळे, तुषार उबाळे, मच्छिंद्र साळवे आदी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

*