Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

निंबोडी फाट्या जवळ टँकर उलटला

Share
पाथर्डी (करंजी) – नगर – पाथर्डी रस्त्यावरील निंबोडी फाटा येथे मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास, तिसगावकडून नगरकडे जाणाऱ्या टॅकरची स्टेरिंग लॉक झाल्याने टँकर रस्त्याच्या कडेच्या खड्यात जावून पडला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही.

याबाबतची माहीती अशी की अकोळनेरला पेट्रोल डिझेल भरण्यासाठी तिसगावहुन निघालेल्या टॅंकरची निंबोडी फाटयाजवळ पोहचला. यावेळी अचानक टँकरचे स्टेरिंग लॉक झाल्याने टॅंकर बाजूलाच असलेल्या खड्यात जाऊन उलटला. पेट्रोल- डिझेलचा टॅंकर उलटल्याची माहिती समजताच त्या ठिकाणी महामार्गाचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. दरम्यान टॅकर मोकळा असल्याने पुढील अनर्थ टळला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!