Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन कार्यक्रम संपन्न

Share

पाथर्डी ( प्रतिनिधी ) – येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात महाविद्यालीन तरुणींसाठी आरोग्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाथर्डी येथील आरोग्यामाता केंद्रातील डॉ. स्वाती सूसे यांनी विद्यार्थीनीना पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार होणे अपेक्षित आहे याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर मुलीमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांना घाबरून न जाता पालक, शिक्षिका यांच्या मार्गदर्शनातून त्या गोष्टीना कशा प्रकारे सहज हाताळू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.

वैद्यकीय भाषेत व शाश्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळाल्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींना त्या स्वबळावर सामोऱ्या जाऊ शकतात असा विश्वास डॉ. स्वाती सूसे यांनी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे तसेच विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा बारवकर, रेश्मा सातपुते, वैशाली वाकडे, कीर्ती मकासरे, प्रा. माया पवार आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुरेखा चेमटे तर आभार प्रा. आशा पालवे यांनी मानले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!