Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

सभापती गायकवाड यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव बारगळला

Share
सार्वमत ऑनलाईन
पारनेर : बाजार समितीचे सभापती प्रशांतं गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार सकाळी ११ वाजता बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. झावरे व गायकवाड गटात संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलुकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, तसेच कर्मचारी राजू चेडे हेच सभागृहात उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक उपस्थित न राहिल्याने बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी ठराव बारगळल्याचे जाहीर करून बैठक संपल्याचे जाहीर केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!