पारनेरमध्ये जोरदार पाऊस

0

पारनेर : शहरात आज रविवारी (दि.8) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे आजच्या आठवडे बाजारच्या दिवशीच झालेल्या मुसळधार पावसाने बाजारकरूंची एकच धावपळ उडाली.

शहर परिसरातील कन्हेर ओहळ,हवालदार वस्ती,पाटाडी मळा,बुगेवाडी,सोबलेवाडी,परिसरात पावसाने हजेरी लावली.

शहर परिसरातील अगोदरच नद्या,नाले,ओढे,बंधारे पूर्ण भरून वाहत असून आज रविवारी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*