पारनेरमध्ये मध्यरात्री आंदोलकांवर लाठीमार, एसटी बस पेटविली

0

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात शेतकरी आंदोलनाद्वारे अनेक शेतकर्‍यांच्या मनातील आक्रोशाला वाचा फुटली आहे. रस्त्यावर उतरून पोलिसांच्या बंदोबस्तापलीकडे वातावरण जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
वडनेर – येथे महाराष्ट्र बंद नंतर रात्रीच्या सुमारास काही आंदोलन कर्त्यांनी पारनेर आगाराची एस.टी बस पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. यात एस.टीचे पुढील बाकडे जळून खाक झाले. हा प्रकार काही ग्रामस्थांना वेळीच लक्षात आल्यानंतर चालक व वाहकाला उठवून आग विझविण्यात आली. वडनेर येथे मुक्कामी असताना ही घटना घडली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अशा समाजकंटकांचा पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, ग्रा.पं.सदस्य गणेश शेटे यांनी निषेध केला.
तसेच पारनेर, टाकळी ढोकेश्‍वर, सुपा, निघोज, भाळवणी, कान्हुर, जवळा, अळकुटी, रांधे, जामगाव, वडझिरे, रांजणगाव मशिद, देवीभोयरे, वासुंदा, काळेवाडी, पानोली, पिंपळगाव रोठा, वडगाव सावताळ, वनकुटे, गोरेगाव, सह सर्वच गावांमध्ये बंदला उत्स्फूर्त व स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला आहे.

मध्यरात्री शेतकर्‍यांवर लाठीमार

टाकळी ढोकेश्‍वर – येथे सोमवारी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यानंतर नगर-कल्याण महामार्गावर रात्री 12.30 वाजता मुंबईकडे जाणारे दूधाचा टँकर अडवून रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले. तसेच फुलांचा टेम्पो अडवून रस्त्यावर फुले फेकण्यात आले. यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये 2 जवान जखमी झाले. 5 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान दौंड येथील राज्य राखीव दलाची तुकडी तैनात असून पोलीस उपनिरीक्षक घुगे, पोलीस नाईक आबा ढोले, पो.कॉ. रोहोकले परिस्थितीवर नियंत्रण ठेउन आहे.c

LEAVE A REPLY

*