Type to search

सार्वमत

अहमदनगर : जिल्ह्यातील १ हजार ६२३ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

Share

अहमदनगर :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्हयातील १ हजार ६२३ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे आदेश राज्य पातळी वरुन निघाले आहेत. बदली पात्र शिक्षकांनी भरलेल्या माहीतीच्या आधारे एनआयसीने ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या बदल्या झालेल्या आहेत.

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मागील वर्षापासून ऑनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ६ ते १३ जून या कालावधीत शिक्षकांना बदल्यांसाठी संगणकीय अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्हयातील मराठी माध्यमातील १५८४ तर उर्दु माध्यमातील ३९ अशा एकुण १६२३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये मराठी माध्यम मराठी माध्यम संवर्ग १ – २८०, संवर्ग २ – २६६, संवर्ग ३ – १०६, संवर्ग ४ – ९३२ अशा एकूण १५८४ तर उर्दू माध्यम संवर्ग १- १०, संवर्ग २ – ९, संवर्ग ३- ०, संवर्ग ४ – २० असे एकूण ३९ आहेत. यानुसार मराठी आणि उर्दू शाळा मिळून १६२३ बदल्या झाल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!