Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडे: कालवे खोदकामाला शेतकऱ्यांकडून विरोध

Share

सार्वमत ऑनलाईन

अखेर प्रशासनाने घेतली शांततेची भूमिका

निळवंडे : निळवंडे धरणाच्या प्रस्तावित कालव्यांच्या कामांना सुरुवात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गुरुवारी संपूर्ण तयारी केली गेली. मात्र निळवंडे,निंब्रळ, म्हाळादेवी,बहिरवाडी,टाकळी यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांकडून कालवे खोदाईच्या कामास तीव्र विरोध करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत निळवंडे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(फोटो – अमोल वैद्य)

दरम्यान आमदार वैभव पिचड हे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासन व पिचड तसेच शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळी बोलताना पिचड म्हणाले कि, प्रशासनाशी आमचे कोणतेही भांडण नाही,शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवा व नंतरच कालवे खोदाई ची कामे सुरू करा असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत वातावरण सावरण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आंदोलनात जि प अर्थ व बांध समिती चे सभापती कैलास वाकचौरे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!