भारनियमनाचे राजकीय फटाके : मागे वळून पहा, कोणी दिसतं का?

0

संपत बारस्कर, आंदोलनं त्यांची मक्तेदारी नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)– जनतेच्या प्रश्‍नांवर आंदोलन करणे म्हणजे कोणाच्या नकला करणं नाही. लोकशाहीत आंदोलनं करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आंदोलनं करणे ही सेनेची मक्तेदारी नाही. अनिल राठोड यांनी पाठीमागे कोणी दिसतं का? याचे उत्तर शोधण्यासाठी एकदा फक्त मागे वळून पहावे, मग त्यांना वास्तव दिसेल असा पलटवार राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी केला.
सेनेच्या आरोपाला उत्तर देताना बारस्कर म्हणाले, सामान्यांच्या प्रश्‍नांवर व त्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी नेहमीच रस्त्यावर उतरते, आंदोलनं करते. लोकशाहीत आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही कोणते आंदोलनं करायची हे ते सांगणारे कोण? आम्ही आमचं ठरविण्यास सक्षम आहोत. महागाई विरोधात सर्वात अगोदर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. त्यानंतर भारनियमनाविरोधात आमदार संग्राम जगताप हे स्वत: आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर सेनेने आंदोलन केले म्हणजे राष्ट्रवादी नाही तर शिवसेनाच राष्ट्रवादीची नक्कल करते असा पलटवार बारस्कर यांनी लगावला.
शहरातील तरुण मतदारांनी आमदार संग्राम जगताप यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादीमागे खंबीरपणे उभा आहे. शिवसेनेला ते खुपत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. अनिल राठोड यांनी एकदा मागे वळून पहावे, मग त्यांना आपल्यामागे कोण आहे हे दिसेल.

परदेशातून लोकं आणायचे का?
पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारीच आंदोलन करतात. त्यामुळे आंदोलनात तेच दिसतील. तुमच्या आंदोलनात तेच दिसतात. प्रत्येक आंदोलनाला चेहरा बदल करायला परदेशातून लोकं आणायचे का? असा सवाल उपस्थित करत बारस्कर यांनी या आरोपाचे खंडण केले. अनेक आंदोलनात आमदार संग्राम जगताप हेही सहभागी झालेले नसतात. आम्ही पदाधिकारी, नगरसेवक आंदोलन करतो, त्यामुळे कळमकर प्रत्येक आंदोलनात असावेच असं काही नाही. ते आमच्या अन् जगतापांसोबतच आहे. त्याची चिंता राठोड यांनी करू नये असा पलटवार बारस्कर यांनी केला.

LEAVE A REPLY

*