Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

भाजप आमदार राम कदम यांच्या पुतळ्याचे नगरमध्ये दहन

Share
अहमदनगर : राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे पडसाद पूर्ण राज्यात उमटत आहेत. त्यांच्या या कृतीचा विविध पद्धतीने निषेध केला जात आहे. महिलांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

आमदार राम कदमांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अपमानास्पद आहे. कदमांनी सर्व माता – भगिनींची जाहीर माफी मागावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!