नवदुर्गा- नंदनवनातील सुवर्ण

0

नगर टाईम्स

अंगण घराची कळा सांगते अन् आचार-विचारातून माणूस कळत असतो. धार्मिक अन् सुसंस्कृत विचाराची माणसं माहेर-सासरी मिळाली की मग ‘तिच्या’तील उपजत कलागुणांना वाव मिळतो. सुवर्णाताई यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडलंय. माहेर अन् सासरात मिळालेली प्रेमळ माणसं, त्यांचं पाठबळ यामुळं ताईंचं नेतृत्व बहरत गेलं, अन् त्यांच्या समाजकारणाचा परिघही विस्तारत गेला. राजकारणात असूनही त्यांनी समाजकार्याचा वसा कधी सोडला नाही. त्यामुळंच आजही पदोपदी त्यांचं नाव ‘दुर्गा’ म्हणूनच घेतलं जातं.
सुवर्णाताईंचा जन्म झाला तो मुळातच भरल्या गोकुळात. वडील सुरेश गाडळकर अन् चुलते चंद्रकांत-अरुण, त्यांची मुलं…अशा एकत्रित कुटुंबात सुवर्णाताई या एकमेव महिला. त्यामुळं लाडाकोडातच त्याचं बालपण गेलं. आजोबा रामचंद्र गणपत गाडळकर यांनी नगरपालिकेत नगरसेवक पद भूषविल्याने तसं पाहिलं तर सुवर्णाताईंना घरातच सामाजिक कार्यासोबतच राजकीय धडे मिळत गेले.  भविष्यात काही लिहून ठेवलंय हे माहित नसतानाही त्यांनी दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश मिळाला. दत्ताशेठ जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ‘नंदनवन’ उद्योगसमुहाच्या माध्यमातून जाधव फॅमिली सामाजिक कार्यात कार्यरत होती अन् आहे. माहेरसारखंच भरेपूरं अन् मायाळू माणसांचा कुटुंब सुवर्णाताईंना मिळालं. स्वत: खाण्यापेक्षा स्वत: बनवून इतरांना खावू घालून, त्यांना तृप्त करणं यातच सुवर्णाताईचा आनंद सामावलेला. माहेरसारखंच सामाजिक कार्य सासरीही सुरू असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळं त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ महिला बचत गट’ सुरू करून त्या माध्मातून सामाजिक कार्यालया सुरूवात केली.
गटातील कोणाचा वाढदिवस आला की त्यातून समाजिक कार्याची पर्वणी त्या साधत, कुटुंबातही तसंच. सामाजिक कार्य विस्तारलं जाव असं जाधव कुटुंबियांना नेहमीच वाटत. 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुवर्णाताईंना उमेदवारी मिळाली अन् त्यांनी राजकीय मैदानात उडी घेतली. विजयाचा गुलालही घेतला. नगरसेविका झाले म्हणून हुरळून न जाता त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवलं. नगरसेविका बिरूदावली नावापुढं लागल्याने त्यांच्या समाज कार्याचा परिघ विस्तारला. योगायोगाने त्यांना स्थायी समिती सभापती पदाची संधीही मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी वार्डाचा विकास करण्याचा ध्यास पूर्णत्वास नेला. संजयनगर झोपडपट्टीतील नागरिकांना हक्कांची घरं मिळावीत यासाठी त्यांनी घरकुल योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करत तो प्रश्न मार्गी लावला. वार्डात जैन समाजासाठी जागा उपलब्ध करून दिली. दिव्यांगासाठी दीड हजार ते तीन हजार रुपयापर्यंतची पेन्शन सुरू करण्यास मंजुरी दिली. 124 कोटी रुपयांचा भुयारी गटार हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मार्गी लावला. काटवन खंडोबा रस्ता मॉडेल करण्याचा प्रयत्न सुरू असून तो अंतिम टप्प्यात आलायं. राजकीय क्षेत्रात असूनही सुवर्णाताईंनी समाज कार्याचा वसा सोडला नाही. राजकारणात असूनही त्यांना राजकारणाचा उपयोग समाज कार्यासाठी केलाय म्हणून त्या ‘नवदुर्गा’ ठरतात.

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा
सुवर्णाताईंचे दिर अमोल हे डॉक्टर. त्यांची जावूबाई प्राजक्ताही डॉक्टरच मिळाली. माळीवाड्यात त्यांनी सरस्वती नावाचं हॉस्पिटल सुरू केलं. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीबांसाठी मोफत आरोग्य तपासणी ते सवलतीच्या दरात उपचार सुरू असतात. एखाद्याकडे पैसे नसेल तर ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून उपचार सुरू करेपर्यंत सुवर्णाताईंचा पाठपुरावा सुरू असतो.

अन् मुक्तांगण मिळालं
सुवर्णाताई यांचं माहेरचं जीवन समृध्द गेलं अन् सासरीही तसंच सुरू आहे. दोन छोटी मुलं घरात असतानाही सासू-सासर्‍यांनी सुवर्णाताईंना पूर्णत: मोकळीक दिली. त्यातून त्यांनी सामाजिक अन् राजकीय पाया भरभक्कम केला. आजही त्यात परोपकारासाठी अव्यहातपणे कार्यरत असल्याचे दिसते. या कामात त्यांना मिस्टर दत्ताशेठ यांचे मोलाचे पाठबळ मिळाले. नुकताच त्यांनी ‘शिवसेना’ पक्षात प्रवेश करून धनुष्य हाती घेत आपला परिघ आणखी वाढविलाय.

LEAVE A REPLY

*