Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

होळीत लाकूड ऐवजी शेणाच्या गौर्‍या वापरण्याचा संकल्प

Share
पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंदची जनजागृती मोहीम
अहमदनगर (प्रतिनिधी)- होळीत जाळण्यात येणार्‍या झाडांच्या लाकडा ऐवजी शेणाच्या गौर्‍यांचा वापर व्हावा तसेच दुष्काळाच्या पार्श्‍वभुमीवर धुलिवंदन व रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी कोरडे रंग खेळण्याचे आवाहन माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात आली असून, याचा प्रारंभ सावेडी येथील निर्मलनगर येथून करण्यात आला.

होळीसाठी शेणाच्या गौर्‍यांचा वापर केल्यास झाडांची कत्तल काही प्रमाणात थांबणार आहे. शेतकर्‍यांना गौर्‍याच्या माध्यमातून रोजगार देखील मिळणार आहेत. तर प्रदुषण देखील कमी प्रमाणात होणार आहे. तसेच धुळीवंदन व रंगपंचमीत पाणीचा अपव्यय टळल्यास मोठ्या प्रमाणात पाणी बचत होणार असल्याची भावना शिवाजी पालवे यांनी व्यक्त केली.

या मोहिमेत सर्व नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे दिपक पालवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ.संतोष गीते यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सहयोग देणे ही मोठी समाजसेवा असून, देशसेवेचे कर्तव्य बजावून माजी सैनिक समाजसेवा करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब देशमाने, विठ्ठल लगड, संजय पटेकर, बन्सी दारकुंडे, दिगंबर शेळके, रमेश जगताप, गणेश पालवे, बळवंत पालवे, आनंदा गीते, सचिन दहिफळे, आबासाहेब साळवे, संजय आठरे, तुकाराम पालवे, दिपक पालवे, राजू खेडकर, खंडू आव्हाड, दिनकर गीते, विठ्ठल खेडकर, आंबादास बडे, दत्तात्रय बांगर, बाबुराव आव्हाड, संतोष गीते, मयुर नवगीरे आदिंसह नागरिक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!