Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महापौर काका… कचरा रॅम्प हटवा की…

Share

विद्यार्थ्यांचं आर्तव । मनसेचा पुढाकार

नगर टाइम्स
अहमदनगर (प्रतिनिधी) – माळीवाड्यातील फिरोदिया शाळेलगत असलेला कचरा रॅम्प हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गेट बंद करत वाहने अडविली. मनसेच्या पुढाकारातून आज शुक्रवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. महापौर काका, कचरा रॅम्प हटवा, अशी आर्त हाक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली.

माळीवाड्यात सविता रमेश फिरोदिया प्रशाळेच्या भिंतीलगतच महापालिकेचा कचरा रॅम्प आहे. त्यासमोरही भाऊसाहेब फिरोदिया ही शाळा आहे. शहरातील कचरा संकलन करून आलेली वाहने या रॅम्पवर येतात. तेथून कचरा पलटी करून तो डेपोपर्यंत नेला जातो. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी त्रस्त आहेत. मनसेने अनेकदा महापालिकेकडे रॅम्प इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी केली, पण महापालिकेने दुर्लक्ष केले. मनसेने आज शालेय मुलांना सोबत घेत रॅम्पचे गेट बंद करून घेत वाहने अडविली.

मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्या नेतुत्वाखाली शालेय मुलांना बरोबर घेऊन गेटबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचीन डफळ, शहरअध्यक्ष राशीनकर, अ‍ॅड अनीता दिघे, पोपट पाथरे, दत्तात्रय गाडळकर, अभिनय गायकवाड़, नंदकुमार भोसले, तुषार हिरव, गणेश मराठे, दीपक दांगट यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कचरा रॅम्प मुले शालेय मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाला शाळा, पालक, मनसे पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले, तोंडी सुचना केली. पण महापालिकेने रॅम्प हलविण्याच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचे नितीन भुतारे यांनी सांगितले. हे शेवटचे आंदोलन असून महापालिकेने दिलेल्या आश्‍वसनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आणखी दीड महिना..
महापालिकेने कॉमपॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी टेंडर कॉल केले आहे. ही खरेदी झाल्यानंतर हा कचरा रॅम्प बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान 45 दिवसांचा अवधी लागणार असल्याचे लेखी आश्‍वासन महापालिकेने दिले आहे. म्हणजे आणखी दीड महिना रॅम्प हटविण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!