Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

विना परवाना होर्डिंग लावणार्‍यावर गुन्हे दाखल करणार

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – अनधिकृत होर्डींग्ज व फ्लेक्सवर महापालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना लावणार्‍यावर कोर्टच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेख इथापे यांनी नगर टाइम्सला दिली.

महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत होडींग्जवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पत्रकार चौक, लालटाकी, न्यू आर्टस कॉलजे रोड, दिल्लीगेट मार्ग मध्यवर्ती भागातील बोर्ड काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत होती. दुपारी उशीरा पर्यंत ही कारवाई सुरूच होती. दरम्यान काल (सोमवार) शहरातील 40 पेक्षा जास्त होडींग्ज काढून टाकत कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे. तर आज शहरातील अनाधिकृत होडींग्ज व बोर्ड लावणार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!