‘सुगंधी बातम्या’च्या दहशतीखाली मुकुंदनगरात एलसीबीची रेड

0

पुरवठादारांचे आपसातील हेवेदावे जिरवा-जिरवीसाठी पोलिसांचा वापर

अहमदनगर  : सुगंधी तंबाखू विक्रीला बंदी असली तरी खुलेआम बाजारात त्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. ‘सुगंधी बातम्या’च्या दहशतीखाली पोलिसांनी मुकुंदनगरमधील मावा तयार करणार्‍या दोन कारखान्यांवर कारवाई केली. शेवगावातील कारवाईलाही त्याचाच वास लागला. पोलिसांना ‘सुगंधी बातम्या’ देण्यामागे पुरवठादारांच्या व्यावसायिक स्पर्धेचे हेवेदावे असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सुगंधी तंबाखु विक्रीच्या बेकायदा व्यावसायाला प्रोटेक्शन मिळावे यासाठी ‘सुगंधी बातम्या’ पेरल्या जात असल्याचे यातून समोर येऊ पाहत आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुकुंदनगरमध्ये छापा टाकून सुगंधी तंबाखूपासून मावा तयार करणारे दोन कारखाने सील केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडे पुढील कारवाई करण्याचे अधिकार असल्याने हे प्रकरण आता त्यांच्या कोर्टात गेले आहे. मुळात अख्ख्या नगर शहरात सुगंधी तंबाखू खुलेआम विकली जात आहे. छोट्या टपर्‍यांवर मावा मळला जात असल्याचे अख्ख्या नगरला माहिती आहे.

टपरीधारकांनी आपलाच माल घ्यावा यासाठी पुरवठादारांमध्ये स्पर्धा लागली आहे. फौजदारी गुन्ह्यात अडकल्यानंतर एका बड्या पुरवठादारांचा धंदा पार बुडाला. त्यामुळे टपरीधारकांनी दुसरा पुरवठादार शोधून आपले ‘दुकान’ सुरू ठेवले. फौजदारी प्रकरणात थोडीशी रिलिफ मिळताच हा पुरवठादार पुन्हा शहरातील छोट्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या वितरकांकडे पोहचला. मात्र त्यांनी दुसरा पुरवठादार शोधल्याने त्याचा माल घेतला नाही. परिणामी त्याने पोलिसांनी ‘टीप’ देऊन त्यांचा ‘कार्यक्रम’ सुरू केला आहे. आपल्या बेकायदा धंद्याला संरक्षण मिळावे यासाठी त्याने ‘सुगंधी बातम्य’ पसरविण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. पोलीसही त्या ‘मोहाला’ बळी पडले आहेत. शेवगाव येथील माव्यावरील कारवाईचा प्रकार त्यातूनच घडला. पुरवठादारांच्या व्यावसायिक स्पर्धेत छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी थेट पुरवठादारांच्या घरावर धाडी टाकल्या तर मुळावरच घाव पडेल. पण ती हिंम्मत पोलीस करत नाही. फुड अ‍ॅन्ड ड्रग्ज विभाग तर दूरून गंम्मत पाहत आहे. पुरवठादारांखाली मिंधे असल्याने ते कारवाई करतच नाही.

एमआयडीसीत सुगंधी तंबाखुचा मोठा खजिना पोलिसांना मिळाला होती. ही टीपही त्यावेळी पोलिसांनी पुरवठादारांच्या व्यावसायिक स्पधेतूनच मिळाली. नंतर त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे. पुरवठा विभागाने अहवाल आला असून कारवाईसाठी तो राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविला असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*