अहमदनगर तालुका सहकारी दूध संघाचे अस्तित्व संपुष्टात

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाचा कारभार गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संघावर अवसायक म्हणुन सहकारी संस्थेचे (दुग्ध) सहाय्यक निबंधक ए. व्ही. भांगरे यांची नेमणुक करण्याचे आदेशही नाशिक विभागीय उपनिबंधक बी. वाय. पगारे यांनी दिले आहेत. या आदेशावर कोणाला काही म्हणणे मांडावयाचे असल्यास 30 जुन पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र या आदेशामुळे अहमदनगर तालुका सहकारी दुध संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
अहमदनगर तालुका सहकारी दुध संघावर उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभागाने अवसायनाचे आदेश दिल्यानंतर संघावर अवसायक म्हणून चार सदस्यीय अवसायक पुर्नजिवन समितीची नेमणुक करण्यात आली होती. मात्र आदेश पारित झाल्यापासुन बराच कालावधी होवून देखील समाधानकारक रित्या कामकाज केल्याचे दिसून येत नसल्याने व सदर समिती ज्या उदिष्टासाठी स्थापन करण्यात आली होती, त्यानुसार कामकाज होत नसल्याचे विभागीय उपनिबंधक यांच्या निदर्शनास आले होते. यामुळे सदरील संघ विसर्जित करणे आवश्यक असल्याचे सांगत व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 चे कलम 103 (1) (क) (2) अन्वये अहमदनगर तालुका सहकारी दूध संघ विसर्जनाचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत पूर्नजीवन समितीच्यावतीने म्हणणे मांडावयाचे असल्यास एक महिण्यात लेखी स्पष्टीकरण करण्यासाठी 30 जुन रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. यामुळे अहमदनगर तालुका सहकारी दूध संघाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

LEAVE A REPLY

*