Type to search

समाजसेवेचा सुरेखसंगम

आवर्जून वाचाच नवरात्री सार्वमत

समाजसेवेचा सुरेखसंगम

Share

नव ‘दुर्गा’

वडील अन् त्यांचे सख्खे, चुलतभाऊ अशा तब्बल 21 काकांच्या कुटुंबकबिल्यात सुरेखाताईंनी जगात पाऊल ठेवले. वडील हरिभाऊ राऊत स्वातंत्र्यसैनिक, तर काका जालना नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष. त्यामुळं घरातच ताईंना समाजकार्य, देशसेवा अन् राजकारणाचे बाळकडू मिळत गेले. अशा वैभवसंपन्न कुटुंबातील सुरेखाताई नगरमधील कदम कुटुंबाच्या सूनबाई झाल्या. माहेरी मिळालेला सेवेचा अन् शिस्तीचा उपजत वारसा नगरमध्ये जपत त्यांची घोडदौड सुरू झाली. नगर महापालिकेत महापौर झाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
घराची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे घरातूनच राजकीय, सामाजिक कार्यचे धडे मिळाले… त्यांनी राजकीय धडे वाचत त्यांनी वाणिज्य विषयात पदवी घेत त्यांनी ते पूर्ण केले….. भाविष्यात त्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर होतील हे देखील माहिती नव्हते….माळीवाडा भागातील नगरसेवक अशोकराव कदम यांच्या संभाजीराजेंशी त्यांचा विवाह झाला. कदमच्या घरात सुध्दा राजकीय वारसा होता. ताईंच्या लग्ननंतर राजे हे शिवसेनेचे शहरप्रमुख झाले. माहेरसारखे सामाजिक व राजकीय कार्य सासरी सुरू झाल्याचे त्यांना हळूहळू जाणवू लागले. त्यानंतर सुरेखाताईंनी माळीवाडा भागातील महिलांचे संगठण सुरू करण्यात सुरूवात केली. पुढे 2013 मध्ये डिसेंबर महिन्यात महापालिकेची निवडणूक लागली. माळीवाडा भागतून त्यांनी शिवसेनेच्या पक्षावर निवडणूक लढविण्याचा आग्राह समाजातून होता. ताई महापालिकेच्या निवडणूक हातात शिवधनुष्य हातात घेऊन निवडणूकीत उतरत त्यांनी समाजिक कार्याच्या जोरावर विजय देखील खेचून आणत आपले राजकीय कौशल्य त्यांनी नगरकरांना दाखवून दिले. पुढे महापाालिकेचे महापौरपद हे महिला राखीव असल्यामुळे त्यांना महापौर होण्याची संधी देखील मिळाली. सासर्‍याचे नगरध्यक्ष होण्याचे स्वप्न सुनेनेपूर्ण केल्याचे समाजातील जेष्ठ नागरिक सांगतात.

रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, विविध सामाजिक उत्सावाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य सुरू असतांनी त्यांनी महापौरपदाच्या माध्यमातून नगरच्या विकासाला हात घातला..शहर बस सेवा, अमृत योजना,फेज-2, महिला सक्षमीकरण, गार्डन उभारणी, पक्के रस्ते, पिंपळगाव माळवी येथील 700 जागेवर पर्यटन स्थळ, कुष्ठरोगांनी महापालिकेच्या माध्यमातून मासिक मानधन, अपंगाना मदत, स्त्री जन्माचे स्वागत अशी विविध कामे त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून केली.
महापालिकेतील राजकारण सर्व नगरकरांना सर्वश्रत आहे. मात्र महापालिकेच्या राजकारात सुरेखाताई तगधरून आहे. विरोधाकांच्या आरोपला देखील महापौर त्यांच्याच भाषेत समाचार घेतात हे देखील अनेक जणांनी अनुभवले आहे. त्यामुळे महापौरांवर आरोप करण्यास पुढे कोणी धजावत नाही.

महापौरांनी प्रस्तावित केलेल्या अनेककामावर प्रशासानाकडे तक्रारी करतात. काम होऊ नये या दृष्टीकोनातून राज्यस्तरावर देखील तक्रारी करतात. मात्र प्रास्तवित कामे नगरकरांच्या गरजेची असल्यामुळे ताई देखील मागे हटत नाही. नवनीतभाई बार्शीकरांची इच्छा असलेली 107 कोटी रूपयांची अमृत योजनेचे काम युध्दापातळीवर सुरू केले….तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी 138 कोटीरूपयांच्या भूयारी गटारीचे काम सांगतात. दरम्यानच्या काळात मागील अडीच वर्ष फेज टूचे काम बंद होते. सुरेखाताईंनी पुढे फेजटूच्या कामासाठी त्यांनी पाठपुरवा सुरू केला. अनेक ठिकाणी काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र विरोधकांच्या बाकावर असलेले नगरसेवक फेजटू च्या कामात अडकाठी करत आहे. त्यामुळे शहरातील काही काम बाकी आहे. मात्र पुढील काही दिवसात ते काम पूर्ण करणार असल्याचे त्या सांगतात.

बाळासाहेब देशपांडे रूग्णालयाच्या नुतनीकरणासाठी निधी वर्ग करणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, कचरा संकलनासाठी अत्याधुनिक कचरा गाड्या खरेदी करणे, शहरात नवीन 22 उद्यानाची उभारणी करणे अशी अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुरेखाताईंचे दीर शिवाजी कदम हे शहर बॅँकेचे विद्यामान संचालक तर समजोता मित्र मंडळाचे अध्यक्ष, तर पती संभाजीराजे हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख..कुटूंबातील सर्व सदस्या सुरेखाताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. व त्यांच्या सामाजिक कार्याला बळ देण्याचा प्रयत्न कदम कुटूंब करत आहेे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!