पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविल्याबद्दल महापौर व माजी महापौरांचा महिलांच्या वतीने नागरी सत्कार

0

अहमदनगर : आगरकर मळा परिसरातील श्रीरामनगरी येथे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते. या प्रश्नाकडे तेथील स्थानिक नागरिक व महिलांनी स्थानिक नगरसेवक अनिल शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यांनी हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांच्याशी याबाबत चर्चा करून तातडीने प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. अखेर हा प्रश्न मार्गी लागला.
याबद्दल महापौर सुरेखा कदम व प्रभाग 27चे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीलाताई शिंदे यांचा श्रीरामनगरी आगरकर मळा येथील स्थानिक महिलांनी सत्कार केला. यावेळी कल्पना भळगट, मंगल शेलार, कमल आचार्य, सोनाली मुनोत, उल्का बनकर, नंदा मुळे, जयश्री ठुबे, स्नेहल चिकोटे, अभय भळगट, डॉ. सुधाकर शेलार, महेश मुनोत, अनिल आचार्य, अहिरवाल आदी उपस्थित होते.
महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, प्रश्नांची तीव्रता लक्षात घेऊन ते सोडविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक कटिबद्ध आहेत. नगरसेवक अनिल शिंदे यांनी श्रीरामनगरी येथील पाण्याचा तीव्र बनलेला प्रश्न लक्षात घेऊन हा प्रश्न सुटावा, यासाठी आपणाशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. आजअखेर हा प्रश्न मार्गी लागला असून, महिलांचे आता पाण्यावाचून हाल होणार नाहीत. शिवसेना नगरकरांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहेत, असे सांगितले.
माजी महापौर शीलाताई शिंदे म्हणाल्या की, प्रभाग 27मधील श्रीरामनगरी परिसरात पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही प्रयत्न करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावला. महिलांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरू होते. पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत होती. प्रभागातील प्रश्न व शहरातील प्रश्न सोडविणे हे आमचे कर्तव्यच आहे.
याबाबत शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली असून, नगरकरांचे प्रश्न सोडविल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना भळगट म्हणाल्या की, अनेक दिवसांपासूनचा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे. अनिल शिंदे यांनी महापौर सुरेखा कदम यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविल्याबद्दल महिलांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते. समस्या सोडविणारे नागरी सत्काराचे हकदार आहेत. चांगले काम करणार्‍यांचा आम्ही नेहमीच पाठीशी असून, सत्कार करतो, असे सांगितले.

LEAVE A REPLY

*