सामाजिक एकीसाठी युवकांच्या पुढाकाराची गरज : आ. जगताप

0

कोठला परिसरात मस्तानशाह सोशल क्लबची स्थापना

अहमदनगर (प्रतिनिधी) – नवरात्र व मोहरमच्या पार्श्वभूमीवर कोठला परिसरात मस्तानशाह सोशल क्लबची स्थापना करून हिंदू-मुस्लिम एकता कायम रहावी, यासाठी क्लबने प्रयत्न करावेत. समाजात एकीची भावना निर्माण होण्यासाठी युवा पिढी आता पुढे येत आहे. हिंदू-मुस्लिम बांधव भाईभाई म्हणून नवरात्रात व मोहरममध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. सोशल क्लबच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
कोठला परिसरात मस्तानशाह सोशल क्लबची स्थापना करण्यात आली. यावेळी आ. अरुण जगताप बोलत होेते. याप्रसंगी नगरसेवक नज्जू पहेलवान, उद्योजक करीमशेठ हुंडेकरी, क्लबचे अध्यक्ष इम्रान पठाण, तौसीफ शेख, शेख हबीब, तबस्सूम मिर्झा, मन्सूर सय्यद, मोहसीन पठाण, मतीन कुरेशी, मुद्दजर शेख, सुंदर माळी, शेख सिकंदर, सय्यद शाहबाज, नगरसेवक आरिफ शेख, बाबा खान, पवन भिंगारे, सलीम भंगारवाले, सय्यद सादिक, मुसद्दिक मेमन, वसीम शेख, अलीम सय्यद, मोहसीन पठाण, शेख हबीब, नासीर भंगारवाले, तौसीफ शेख, तसव्वूर मिर्झा, समद खान, जुबेर सय्यद, यादे हुसेन यंग ग्रुप, हयात युनिटी फौंडेशन, दोस्ती यंग ग्रुप आदी उपस्थित होते.
उद्योजक करीमशेठ हुंडेकरी म्हणाले की, मस्तानशाह सोशल क्लबकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. हिंदू-मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन या क्लबची स्थापना केली आहे. सामाजिक बंधूता, एकता यासाठी क्लब काम करणार असून, या उपक्रमास प्रत्येकाने सहकार्य करून युवकांना प्रेरणा देण्याचे काम करावे. जातीय सलोखा कायम रहावा, यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत असून, या प्रतिष्ठानने आपल्या सामाजिक कार्यातून वेगळेपणा निर्माण करावा, असे सांगितले.
क्लबचे अध्यक्ष इम्रान पठाण म्हणाले की, मस्तानशाह सोशल क्लब स्थापन करण्यामागचा मूळ उद्देशच हा आहे की समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण करून सर्व सण, उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साजरे करावेत. सर्व युवकांनी एकदिलाने एकत्र यावे. यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले.

LEAVE A REPLY

*