राष्ट्रवादीचे मनपात आंदोलन

0

बोल्हेगाव परिसर मनपा हद्दीतून वगळण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महानगर पालिका प्रभाग 4 मधील बोल्हेगाव परिसरातील मनपा हद्दीत कोणत्याही नागरी सुविधा पुरवल्या जात नसल्याने या भागातील नागरिकांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाला जाग आणण्यासाठी निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. यामुळे बोल्हेगाव परिसर मनपा हद्दीतून वगळण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने मनपात जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दत्ता सप्रे, पोपटराव बारस्कर, शहर युवक उपाध्यक्ष राहुल भागवत यांच्या नेतृत्वाखाली बोल्हेगाव ग्रामस्थांनी मनपावर मोर्चा काढला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी नितिन लिगडे, चंद्रकांत काळे, सुदाम कावरे आदींसह परिसारातील 100 हून अधिक नागरिक सहभागी झाले.
यावेळी बोल्हेगाव परिसारात नागरी सुविधा द्या, बंद पडलेली गटार योजनेचे काम पूर्ववत सुरू करा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांच्यावतीने करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*