Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

Share

सार्वमत ऑनलाईन

वरिष्ठांचे आदेश धुडकावत राष्ट्रवादीची भाजपाला साथ

अहमदनगर – महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी बोलताना फाळके म्हणाले कि, कोणत्याही परिस्थितीत नगर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा आदेश शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांनी नगरच्या नेत्यांना दिला होता. मात्र, नगरच्या स्थानिक नेत्यांनी हा आदेश पाळलेला नाही. याला स्थानिक आमदार जबाबदार आहेत. याबाबीची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहित यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व किरण काळे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!