Election : महापालिका निवडणुकीत भाजपला जोराचा झटका ; ४ अर्ज बाद

0

सार्वमत ऑनलाईन  

अहमदनगर (प्रतिनिधी)-  महापालिका निवडणुकीसंबंधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. निवडणुकी पूर्वीच भाजपाला जोरदार झटका बसला आहे. भाजपचे तब्बल ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून त्यात खुद्द भाजपाचे खासदार दिलीप गांधी याचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व सून दीप्ती सुवेंद्र गांधी यांचा समावेश आहे. शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांचा अर्जही बाद झाला आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप उमेदवार सुरेश खरपुडे यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. तसेच प्रदीप परदेशी यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरूद्ध कैलास शिंदे यांनी अनाधिकृत बांधकामाची तक्रार दाखल केली होती. बोराटे यांनी प्रभाग 12 मधून अर्ज दाखल केला होता. संजय घुले यांनी त्यांच्या विरूद्ध आक्षेप अर्ज दाखल केला होता. यामुळे तब्बल सहा वेळा नगरसेवक पद भूषविलेले बाळासाहेब बोराटे यांना मोठा झटका बसला आहे.

अर्ज बाद उमेदवारांचे नावे 

खासदार पुत्र सुवेंद्र गांधी (भाजपा)

खाससदारांच्या सून दीप्ती गांधी (भाजप)

सुरेश खरपुडे (भाजपा)

प्रदिप परदेशी (भाजपा)

विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे (शिवसेना)

योगेश चिपाडे (राष्ट्रवादी)

LEAVE A REPLY

*