मनपाची महावितरणकडून ‘सरासरी’ लूट

0

77 मीटर फॉल्टी,  मोघम बिल

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरमाह लाखो रुपयांचे वीज बिल भरणार्‍या महापालिकेने फॉल्टी मीटरचा शोध लावला आहे. तरीही महापालिकेला महावितरण कंपनी सरासरी बील पाठवनू आकारणी करत आहे. ओरड करूनही वीज वितरण कंपनी महापालिकेला दाद देत नाही.
माळीवाडा येथील जुन्या महापालिका कार्यालयातील मीटर बंद असल्याची माहिती शोधाअंती समोर आली आहे. कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, सावेडीतील क्रिडा संकुल, बागरोजा हडको दवाखाना, जीपीओ चौक आणि मार्केट यार्ड चौकातील सिग्नलचे मीटरही बंद आहे. वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्‍यांचे पॅनल नियुक्त करून महापालिका प्रशासनाने हा शोध लावला आहे.
पथदिवे, कार्यालये, उपकार्यालये, अधिकार्‍यांची निवासस्थाने, स्ट्रीट लाईट, सिग्नल यासाठी 260 वीज मीटर महावितरण कंपनीने दिले आहेत. यातील 77 मीटर बंद अवस्थेत आहेत. वीज वितरण कंपनी सरासरी बील पाठवित आहेत.
ऑगस्टमध्येच महापालिकेने वीज वितरण कंपनीकडे पत्रव्यवहार करून ते बदलून देण्याची मागणी केली मात्र त्याला केराची टोपली दाखविली गेली. आता थकबाकी भरण्यावरून वीज वितरण व महापालिकेत वाद सुरू आहेत. त्यानंतर महापालिकेचा फॉल्टी मीटरचा मुद्दा उजेडात आला.

LEAVE A REPLY

*