राज्यातील सर्वच पंपाची तपासणी होणार

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – मापात पाप (डिस्पेन्सींग युनिटमध्ये फेरफार) करत राज्यातील काही जिल्ह्यात पेट्रोलियम पदार्थ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील 16 जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात पेट्रोलपंप चालकाकडून डिस्पेन्सींग युनिटमध्ये फेरफार करून त्या ठिकाणी अतिरिक्त चिप्स् बसवून पेट्रोलपंप चालकांकडून ग्राहकांची लूट सुरू असल्याची तक्रारी राज्य सरकारच्या नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग मुंबई यांच्याकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने तेल उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व डिस्पेन्सींग युनिट उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी यांच्या समवेत राज्यातील 16 जिल्ह्यातील पेट्रोलपंप तपासणीचा निर्णय घेण्यात आला. या तपासणी मोहिमेतासाठी पथके तयार करण्यात येणार आहेत.

 

या पथकांमध्ये त्या-त्या जिल्ह्यातील प्रत्येकी तीन वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. गोपनीय पध्दतीने या भरारी पथकाकडून पेट्रोलपंपाची तपासणी सुरू झाली आहे.
गुरूवार (दि.18) पासून राज्यातील 16 जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी भरारी पथके तयार करण्यात आले असून पथकातील निरिक्षक दररोज कोणत्या भागातील कोणते आणि किती पेट्रोलपंपाची तपासणी करावयाची याचा निर्णय घेणार आहेेत. या गोपनीय तपासणीचा तपाशील त्यात्या जिल्ह्यातील नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिकार्‍यांना देखील सांगण्यात आलेला नाही.
या तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 3 निरीक्षकांच्या नियुक्त करण्यात आले आहेत. यातील पहिल्या निरिक्षकाने सुरूवातीचे पाच दिवस व व्दितीय निरिक्षकाने नंतरच्या पाच दिवस पेट्रोलपंपाची तपासणी करावयाची आहे. या तपासणीत काही कारणामुळे अचडण आल्यास त्यात्या जिल्ह्याच्या समन्वयक यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आदेश नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग मुंबई यांनी दिले आहेत.

 

 

अहमदनगर, मुंबई महानगर, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, अमरावती,  लातूर, कोल्हापूर, अकोला आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची तपासणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*