अहमदनगर : महाराष्ट्राची लावणी निघाली न्यूझीलंडला

0

सुप्याच्या कालिका कला केंद्राच्या राजश्री व आरती काळे यांना मिळाला मान

अहमदनगर : ढोलकीचा ठेका, घुंगराचा ताल, लावणीचा ठसक्यावर थिरकणारी पावलं, सादरीकरणातील अत्यंत मोहक अदा लोप पावत असतांनाच अवघ्या महाराष्ट्राला लावणीची भूरळ घातली ती म्हणजे नगरच्या ख्यातनाम लावणी सम्राज्ञी तथा अभिनेत्री राजश्री आणि आरती काळे (नगरकर) यांनी. राजश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली राजश्री आणि आरती काळे यांच्या कालिका कला केंद्र सुपा येथील 11 कलावंत 12 ऑक्टोबरपासून 15 दिवसांच्या न्यूझीलंड दौर्‍यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
भारत सरकारच्या आयसीसीआर विभागातर्फ महाराष्ट्राच्या पारंपारिक लावणीचा कार्यक्रम न्यूझीलंड येथे सादर करण्यासाठी सुपा येथील कालिका केंद्राची निवड करण्यात झाली आहे. या दौर्‍याविषयी माहिती देण्यासाठी राजश्री काळे यांनी नगरला रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या म्हणाल्या, न्यूझीलंडच्या दौर्‍यात तेथील दोन शहरातील कलाकारांना लावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परदेशातील सालसा, कंटेम्पररी याप्रमाणेच लावणी, गवळण, मुजरा हे ग्लोबल होऊन महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कृतीची गुढी उभारण्यास सज्ज झाले असल्याचे काळे यांनी सांगितले.
लावणीच्या अदांनी परदेशी रसिकांकडून दाद मिळवणार्‍या काळे म्हणाल्या की, मराठी मातीत असणारा गोडवा आणि सोज्वळता यांनी लावणीला परदेशांत यशस्वी केले. जपान मधील सादरीकरणानंतर हजारो प्रेक्षकांनी खास शैलीत केलेला मानाचा मुजरा लावणीचे श्रेष्ठत्व सिध्द करते. लावणीचा पारंपारिक साज कौतुकाने न्याहाळाणार्‍या बायकांच्या डोळ्यांत उत्सूकतेबरोबरच प्रेमही दिसते. मातीत रुजणार्‍या या कलेला मिळणारे मोठे व्यासपीठ पाहता अनेक उत्तमोत्तम कलाकार भविष्यात पाहायला मिळतील असा विश्‍वास केला.
या दौर्‍यात पारंपरिक गण, गौवळण, मुजरा, नृत्य, अदाकारीची लावणी, बैठकीची लावणी, शुंगारिक लावणी, छक्कड आणि खंडोबाचे जागरण गीत असा तब्बल दोन तासांचा लावणी दर्शन हा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे राजश्री आणि आरती काळे यांनी सांगितले. राजश्री आणि आरती काळे यांच्यासह प्रसिध्द ढोलकी वादक पांडूरंग घोटकर, कृष्णा मुसळे, सुधीर जावळकर, स्मिता बने (गायिका), निवेदक नरेंद्र बेडेकर यांच्यासह कालिका कला केंेद्राच्या आरती जावळे, शीतल काळे, रागिणी काळे, राणी काळे या कलावंताचा या दौर्‍यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

*