शहरावर पाणी टंचाईचे सावट

0

पाणी योजनेसाठी 24 तास वीज द्या, महापौरांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

अहमदनगर : वीज वितरण कंपनीच्या भारनियमनाचा फटका महापालिकेलाही बसला आहे. भारनियमनामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून योजनेला 24 तास वीज द्या असे साकडे महापौर सुरेखा कदम यांनी ऊर्जा मंत्र्यांना घातले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शहरात पाणीबाणी निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही त्यातून निर्माण होऊ शकतो अशी भिती कदम यांनी व्यक्त केली आहे.
मुळा धरणातून आलेले पाणी वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीत पडते. तेथून पंपिंग करून ते मुकुंदनगर, केडगाव, निर्मलनगर व सावेडीतील उंच पाणी साठवण टाकीत सोडण्यात येते. त्यानंतर शहराला पाणी वितरीत केले जाते. भारनियमन सुरू असल्याने वसंत टेकडी येथील पंप बंद राहत असल्याने उंच पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. वीज वितरणच्या भारनियमनामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वसंत टेकडी (सावेडी), आगरकर मळा (केडगाव), सिध्दार्थनगर (नालेगाव), बाळाजी बुवा संपवेल (नालेगाव) येथील पाणी उपसा केंद्राला 24 तास वीज पुरवठा करण्याची सूचना अहमदनगरच्या महावितरण अधिकार्‍यांना कराव्यात तसेच सकाळी सहा ते अकरा वाजेदरम्यान भारनियमन करू नये असेही आदेशित करावे असे साकडे कदम यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घातले आहे.

LEAVE A REPLY

*