Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

बाळासाहेब नाहाटांसह लोणी सेवा संस्थेच्या तत्कलीन संचालकावर गुन्हा दाखल

Share

 

सार्वमत ब्रेकिंग

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – लोणी वि.का .सेवा संस्थेच्या तत्कालीन 13 संचालकाच्या सहसचिव यांनी संगनमताने 7/2/2015 ते 26/9/2018 या काळात मयत सभासदाच्या विमा रकमेत संगनमताने अपहार केला. यात संस्था रोज किर्द, व्हाऊचर आणि मयताची पत्नी यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये विसंगती सापडली.

संचालक मंडळ व सचिव यांनी खोटी व्हाऊचर तयार केली. बोगस नोंदी केल्या, खोटे आभिलेख तयार केले व मयत सभासद्च्या विमा रकमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व या संस्थेचे संचालक प्रवीणकुमार नाहटा यांच्या सह लालासाहेब काकडे, सुभाष कोळपे, विठ्ठलराव खेडकर, मोहन काकडे, राजाभाऊ काकडे, बाबासाहेब कुदांडे, संभाजीराव काकडे, रुपाली काकडे, संतोष काकडे, भगवान धाकड, यांच्यासह सचिव बबन भागवत, श्रीपती साळवे अशा १३ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलिसात तपासी आधिकारी चाबूकस्वार यांनी महाराष्ट्र सह्कारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!