कुख्यात गुंड चन्या बेग पोलिसांच्या जाळ्यात

0

एलसीबीची मोठी कामगिरी

अहमदनगर : मुंबई, ठाणे, पुणे, नगर शहरांतील शंभरापेक्षा अधिक गुन्ह्यात हवा असलेला कुख्यात गुंड चन्या बेगसह तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आज शुक्रवारी सकाळी नगर शहरात सर्वांत मोठी कामगिरी केली. चन्या ऊर्फ सागर अशोक बेग (वय 30, राहणार डावखर रोड, श्रीरामपूर), टिपू ऊर्फ आकाश अशोक बेग (वय 25, डावखर रोड, श्रीरामपूर) व सागर साहेबराव शिंदे (राहणार दळवी चाळ, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
चन्या बेग हा कुख्यात गुंड आहे. शिर्डीमध्ये चेन स्नॅचिंगचे रॅकेट तोच चालवित होता. खून, दरोडे, जबरी चोरी, खंडणी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबईचे पोलिस गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या मागावर आहेत. मात्र, त्यांना तो सापडला नाही. नगरच्या पोलिसांनी आज सकाळी नगर शहरात त्याच्या मुसक्या आवळल्या. खंडणी मागण्यासाठी तो नगरमध्ये आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचनेनुसार पवार यांनी कर्मचार्‍यांसमवेत सापळा लावून चन्या बेगसह तिघांना पकडले.

10 वर्षांपासून होता पसार
चन्या बेगच्या गुंडगिरीमुळे नगर जिल्हाच नव्हे तर राज्याचे पोलिस दल हैराण झाले होते. 10 वर्षांपासून तो गुंडगिरी करून पोलिसांच्या सापळ्यातून अलगद सटकत होता. चन्या बेग नाव घेतले तरी भलेभले पोलिस अधिकारी त्यापासून दूर जात. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी स्वतः नेतृत्त्व करत चन्या बेगच्या मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

*