अत्याधुनिक सुविधा असलेली ‘तेजस’ रेल्वे २२ मेपासून धावणार

0

भारतीय रेल्वेची नवीन ट्रेन तेजस धावण्यासाठी तयार झाली आहे.

या रेल्वेचा प्रवास २२ मे रोजी सुरू होणार आहे. पहिली रेल्वे मुंबई आणि गोवा या मार्गावरून धावणार आहे.

अनेक नवी वैशिष्ट्ये आणि सुविधायुक्त असलेल्या या रेल्वेचे तिकीट दरही राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त आहेत.

विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय आदी सुविधा या रेल्वेत प्रवाशांना मिळणार आहेत.

ही रेल्वे सुमारे २०० किमी इतक्या वेगाने धावू शकते. परंतु, भारतीय रेल्वे रूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल १३० किमी इतक्या वेगाने धावू शकेल. रेल्वे रूळांत योग्य बदल केल्यास २०० किमी वेगाने रेल्वे धावू शकते.

पावसाळी वेळापत्रक

सोमवार, बुधवार, शनिवार
सीएसटी – पहाटे 5.00 वाजता
करमाळी – दुपारी 3.40 वाजता

परतीचा प्रवास
मंगळवार, गुरुवार, रविवार
करमाळी – दुपारी 2.30 वाजता
सीएसटी – रात्री 11 वाजता

पावसाळा वगळता
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
सीएसटी – पहाटे 5 वाजता
करमाळी – दुपारी 1.30 वाजता

परतीचा प्रवास
करमाळी – दुपारी 2.30 वाजता
सीएसटी – रात्री 11 वाजता

तेजसचे थांबे
सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी

LEAVE A REPLY

*