७४ देशांमध्ये सायबर हल्ले, ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणा हॅक

0
ब्रिटनमधील अनेक रुग्णालयांमधील कॉम्प्युटर्स ठप्प झाले आहेत, सगळे कॉम्प्युटर्स रँसमवेअर व्हायरसच्या मदतीने हॅक करण्यात आले आहेत.

जगभरातील ७४ देशांमध्ये याप्रकारचे सायबर हल्लेझाले आहेत. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जवळपास ७५ हजार कॉम्प्युटर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. WanaCrypt 2.0 नावाच्या रँसमवेअरच्या मदतीने हॅकर्सनी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा खंडित केली आहे.

रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.

हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.

स्पॅम मेल्सच्या मदतीने हॅकर्सनी कॉम्प्युटरमधील यंत्रणा हॅक केली आहे. यासाठी मेलच्या माध्यमातून इनव्हॉयसेस, जॉब ऑफर्स, सुरक्षा सूचना यांचा वापर करण्यात आला आहे. रँनसमवेअरच्या मदतीने हॅक करण्यात आलेला कॉम्प्युटर्स पूर्ववत करण्यासाठी हॅकर्सकडून ३०० ते ६०० अमेरिकन डॉलरची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*