Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

कोरठणला कार्तिक पौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न

Share

अहमदनगर – प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव रोठा (ता.पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत पौर्णिमेची पर्वणी साधून हजारो भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले.

पहाटे ६ वाजता खंडोबाच्या मूर्तीस मंगलस्नान करण्यात आले. सकाळी सात वाजता खंडोबाची अभिषेक महापुजा करण्यात आली. यावेळी सुभाष व अलका पठाडे,गंगाराम व शारदा पठाडे,शांताराम व कुसुम पठाडे,भानुदास व वैशाली पठाडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी देवस्धानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड विश्वस्त मनीषा जगदाळे, किसन मुंढे, बन्शी ढोमे, देविदास क्षीरसागर, दिलीप घोडके, तसेच रामदास मुळे, शांताराम खोसे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!