Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगावात हरणांच्या कळपाकडून उभ्या पिकांची नासाडी; वनविभागाचे दुर्लक्ष

Share

वनविभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना 

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील वारी , शिंगवे , धोत्रे , भोजडे तसेच कान्हेगाव परिसरातील हजारो हेक्टर जमिन हरणांनी उद्धवस्त केली आहे. हरणाची कळपची कळप या परिसरात असल्याने या हरणांनी मोठा धुडगूस घातला आहे.एकिकडे दुष्काळाशी दोन हात करत असताना हरणांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वनविभागाकडुन कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने येथील शेतक-यामंध्ये संताप व्यक्त होत आहे.

निसर्गाच दुष्टचक्र , अनेक वर्षापासुन असलेल दुष्काळाच सावट अशा असंख्य अडचणीत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी सापडले आहेत. पावसाच्या पाण्यावर येथील बहुतांश शेती अवलंबुन आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासुन पाण्याअभावी शेती संकटात सापडली आहे. तालुक्यातील वारी , शिंगवे , धोत्रे , भोजडे , कान्हेगाव आदी गावात हरणांचा मुक्त संचार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल दिड हजारांच्यावर हरणांचा या परिसरात वावर आहे. उभ्या पिकात हे हरणांचे कळप घुसत असल्याने पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. कांदा , सोयाबिन , मका , कपाशी आदी पिके त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. पाण्याअभावी जेम तेम उत्पन्न यंदा शेतक-यांना मिळत असताना हरणांनी धुडगुस घातल्याने आहे ती पिक नष्ट होत आहेत. गेल्या 13 वर्षापासुन हरणांचा वावर या परिसरात आहे. पाणवठे नसल्याने हरणांचे कळप शेतीत घुसतात…वनविभागाला वेळोवेळी सुचना देवुनही वनविभागाकडुन सातत्यान दुर्लक्ष केल जात आहे. यामुळ अनेकांनी शेती करणेही सोडुन दिल आहे. वनविभागाकडुन पंचनामे होतात मात्र मदत वेळेत मिळत नाही तर जी मिळते ती ही तुटपुंजी मिळत असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.

हरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात वनविभागाने कुत्रीम पानवठे निर्माण करण्याची गरज आहे. शेती महामंडळाची हजारो एकर जमिन असताना वनविभाग मात्र डोळेझाक करत आहे. वन्यप्राण्यांच्या सरंक्षाणासाठी कठोर कायदे आहेत त्यामुळे शेतक-यांची मोठी कोंडी झाली आहे. उभी पिक डोळ्यादेखत उद्धवस्त होत आहेत. शेती वाचवण्यासाठी कडा पहारा देवुन , प्रसंगी डोळ्यात तेल घालुन येथील शेतकरी पिकांच नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने हरणांकडुन होणारा शेतीचा विध्वंस थांबण्यात यश येत नाही. काही पिके हरणांकडुन खाल्ली जातात तर अनेक पिके ही पायाखाली तुडवली जातात. अशा परिस्थीत जगायच कस आणि मुलाबाळांच शिक्षण करायच कस असा प्रश्ऩ येथील शेतक-यांना सतावतोय..

वनविभागाने वेळीच दखल घ्यावी आणि मानवी वस्ती तसेच शेतामंध्ये हरिण घुसणार नाही याकरिता वनविभागाने वेळीच पावल उचलण आवश्यक आहे. झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत करुन नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता येथील शेतकरी करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!